Pandurang Hari
nisarg-wari-banner-mobile

निसर्ग वारी

प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान

पांडुरंग हरी.. प्लास्टिक, थर्माकोल कचरामुक्त पंढरीची वारी!

पंढरीची वारी संतांनी आखून दिलेल्या पर्यावरणपूरक पद्धतीने शेकडो वर्षे सुरु होती. मात्र मागील काही वर्षांत वारीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेस, कप्स यांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वापरलेल्या या प्लेट्स निसर्गचक्रात विघटन पावत नाहीत. दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या प्लेट्स तशाच टाकून दिल्या जातात किंवा जाळल्या जातात त्यामुळे हवा, जमीन आणि पाणी यांचे प्रचंड प्रदूषण होते. खरकट्या डिशेस खाल्ल्यामुळे शेकडो जनावरे मरण पावतात. प्लॅस्टिक आणि थर्माकोल डिशेस मध्ये गरम पदार्थ वाढल्यामुळे त्यातील कर्करोगजन्य रसायने अन्नात मिसळले जातात. हे टाळण्यासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर पुन्हा सुरु करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. वारकऱ्यांनी वारीमध्ये पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर करावा यासाठी प्रबोधानासह विविध स्तरांवर थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच कार्य करीत आहे. वारकरी संप्रदायातील चाळीस ह. भ. प. महाराजांचा, दिंडीप्रमुखांचा अभियानात सक्रीय सहभाग मिळत असून वारीमार्गात असलेल्या गावांतील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे प्रदूषण मुक्तीसाठी प्रबोधन करण्यात आले आहे.

प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेसच्या तुलनेत पानांच्या पत्रावळींची किंमत अधिक असल्याने दिंडीचालक प्लास्टिक आणि थर्माकोलच्या डिशेसना प्राधान्य देतात ही अडचण सोडविण्यासाठी थं क्रिएटीव्हने समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, अन्नदान करणाऱ्या संस्था, पत्रावळींचे विक्रेते आणि दिंडीचालक यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना सवलतीच्या दरात नैसर्गिक पानांच्या पत्रावळी उपलब्ध होण्यासाठीची रचना उभी केली आहे. अशा पद्धतीने २०१८  साली २५ लाख पत्रावळी उपलब्ध करून दिल्या होत्या. २०१९ सालच्या वारीमध्ये एक कोटी पत्रावळी वारीमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या.

अभियानाची उद्दिष्ट्ये 

  • प्रदूषणकारक आणि मानवी आरोग्यास घटक असलेल्या प्लॅस्टिक आणि थर्माकोल प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापरण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करणे.
  • नैसर्गिक पानांच्या पत्रावळी सवलतीच्या दरात उपलब्ध होण्यासाठी विक्रेते, दिंडीचालक आणि दानशूर मंडळी यांचा समन्वय साधणे.  
  • वापरलेल्या पत्रावळींवर सेंद्रिय प्रक्रिया करून त्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते वारीमार्गातील शेतकऱ्यांना वितरीत करणे. 
  • प्रसाद तसेच दर्शनासाठी पान-फुल नेण्यासाठी प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी कापडी पिशव्या नेण्यासाठी नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे, भक्तांचे वारीपूर्व काळात प्रबोधन करणे. 

मार्गदर्शक मंडळ

  • मा. डॉ. श्री नितीन करमळकर 
    कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • मा. डॉ. श्री देवानंद शिंदे
    कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
  • मा. डॉ. मृणालिनी फडणवीस,
    कुलगुरू सोलापूर विद्यापीठ 
  • ह. भ. प. श्री अभयजी टिळक, प्रमुख विश्वस्त श्रीज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी, श्रीक्षेत्र आळंदी
  • ह. भ. प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर
  • ह. भ. प. श्री शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर, ज्येष्ठ आचार्य, वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी 
  • ह. भ. प. श्री प्रसादमहाराज अमळनेरकर,
    संत श्रीसखाराम महाराज संस्थान अमळनेर 
  • मा. सुवर्णलताताई भिशीकर,
    संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका 
  • ह. भ. प. श्री देवदत्त उर्फ राणा महाराज वासकर, वारकरी पाईक संघ श्रीक्षेत्र पंढरपूर
  • मा. श्री गोपाळराव गोसावी,  संत श्रीसोपानकाका देवस्थान श्रीक्षेत्र सासवड
  • ह. भ. प. श्री संजयमहाराज धोंडगे, संत श्रीनिवृत्तीनाथ पालखी सोहळा, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर 
  • मा. श्री रवींद्र पाटील,  संत श्रीमुक्ताबाई दिंडी प्रमुख श्रीक्षेत्र मुक्ताईनगर 
  • ह. भ. प. श्री चारुदत्त आफळे महाराज, सदस्य
    श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर 

प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान, निसर्गवारीची माहिती देणारी व्हिडीओ फिल्म

maharaj-1400x800-64

पर्यावरणाचे रक्षण आपण स्वतः करू इतरांचे प्रबोधन करू

प्रबोधनातून समाजपरिवर्तन हीच संतांची शिकवण आहे. ही शिकवण आपण आचरणात आणू, इतरांचे प्रबोधन करू, मनपरिवर्तन करू. साधे-सोपे उपाय अमलात आणू आणि पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण करू.

प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेस मध्ये गरम अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोका आहे

वारीच्या दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी लाखो थर्माकोल आणि प्लास्टिक डिशेस वापरल्या जातात. नंतर त्या तशाच टाकून दिल्या जातात. वारीमार्गावरील आपल्याच बांधवांची शेते, विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान यामुळे होते आहे.  

वारीतून आणि इतर कार्यक्रमांतून प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेश हद्दपार करू!

वारीच्या दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी लाखो थर्माकोल आणि प्लास्टिक डिशेस वापरल्या जातात. नंतर त्या तशाच टाकून दिल्या जातात. वारीमार्गावरील आपल्याच बांधवांची शेते, विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान यामुळे होते आहे. 

पानांपासून बनलेल्या पर्यावरणस्नेही द्रोण पत्रावळी यांचा वापर करू !

पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण निसर्गाचाच भाग असलेल्या पानांपासून बनवल्या जातात. काही दिवसांतच त्यांचे विघटन होते. त्यांच्यापासून पर्यावरणास कसलीही हानी पोचत नाही.   

माउली आणि तुकोबांच्या दर्शनाला जाताना कॅरीबॅग ऐवजी पानात बांधून फुले नेऊ!

वारीमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी जाताना पानफुल नेण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅग वापरतात. त्याऐवजी पानात नेल्यास दररोज लाखो पिशव्यांपासून होणारे दीर्घकालीन अनिष्ट परिणाम करणारे प्रदूषण टाळले जाईल.   

वारी मध्ये भोजनासाठी स्टीलच्या ताट-वाटी ऐवजी द्रोण पत्रावळी वापरू

प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेश ऐवजी भोजनासाठी स्टीलच्या ताट वाट्या वापरण्याकडे काहींचा कल आहे. मात्र वारीमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या स्टीलच्या ताट वाट्या धुण्यासाठी टैंकरने पुरावालेल्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. सोबत डिटर्जन्ट मुळे प्रदूषणही होते.   

माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांचे मनोगत

थं क्रिएटिव ने आयोजीत केलेल्या प्लास्टिक कचरा मुक्त भारत अभियानात केंद्रीय केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांनीही सहभाग घेतला. त्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत.

निसर्ग वारी उपक्रम

‘प्रबोधनातून समाजपरिवर्तन’ या संतांनी दाखवलेल्या मार्गाने प्लास्टिक आणि थर्माकोल प्रदूषणाच्या भस्मासुरावर नियंत्रण ठेवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ‘निसर्ग वारी’ गेली सहा वर्षे वारकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

people-pleding-600x400-3
वारी आवाहन

दिंड्यांमधील  वारकरी, दिंडी प्रमुख, हरीभक्त परायण कीर्तनकार, प्रवचनकार यांनी प्लास्टिक थर्माकोल प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन वारी केली आणि वर्षभर समाजाचे प्रबोधन केले तर प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त स्वच्छ भारत ही संकल्पना लवकरच सत्यात उतरेल 

wari-walking-people-600x400-78
प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासुर

प्लास्टिक थर्माकोल प्रदूषण या समस्येचे मूळ कारण केवळ अनास्था आणि पर्यावरण रक्षणाबद्दल असलेली उदासीनता हेच आहे. समस्येची गंभीरता आणि तिचा आकार समजून आल्याशिवाय त्यावर मात करता येत नाही. सर्वंकष प्रबोधनानेच त्यावर मात करता येईल.

प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानात सहबागी होऊन पर्यावरण रक्षणासाच्या या जनअभियानात आपणा सर्वांच्या सक्रीय योगदानाची आवश्यकता आहे

  • वारी कालावधी मध्ये तसेच वर्षभर सुरु असलेल्या विविध उपक्रमांमध्ये आपण म्हणून सहभागी होऊ शकता (वारी काळात कमीत कमी ३ दिवस ते २० दिवसांपर्यंत 
  • आपण आपल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थेसह अभियानात सहभागी होऊन आपल्या कडे असलेल्या विशेष ज्ञानाचे, कौशल्याचे योगदान अभियानासाठी देऊ शकता 
  • आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ अभियानासाठी आर्थिक योगदान देऊ शकता. 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी

चला वारीमध्ये सहभागी होऊ, पर्यावरण संवर्धनाचे दूत होऊ.
निसर्ग वारी उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया आपले नाव नोंदवा.