व्हिडीओ गॅलरी

प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान- निसर्गवारी २०२३, श्री प्रशांत अवचट यांची दै. तरुण भारतने घेतलेली मुलाखत.

पुण्यातील अगरवाल कुटुंबीय गेल्या वीस वर्षांपासून वारीमध्ये वारकऱ्यांना अन्नदान करत आहेत. अन्नदानासाठी ते कटाक्षाने नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या द्रोणांचा वापर करतात. पर्यावरण आणि पाणी बचत याविषयी अगरवाल कुटुंबीयांकडे असलेल्या जागरूकते बद्दल त्यांचे कौतुक आणि शुभेच्छा

नातेपुते हे वारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. परिसरातील लाखो भाविक पालखी सोहळ्यासाठी इथे येतात. त्यामुळे प्लॅस्टिक, थर्माकोल प्लेट्सचा कचरा, दिंड्यांचा पाणी पुरवठा, स्वच्छ्ता यामुळे नातेपुते नगर पंचायत व्यवस्थापनावर मोठा ताण येतो. यावरील सोपा उपाय म्हणजे नैसर्गिक पानांच्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करणे. या विषयी नगर पंचायतीचे उपनगराधक्ष श्री मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केलेले मनोगत.

श्री जेठाभाई जाधव धर्मशाळा पंढरपूर येथील व्यवस्थापक श्री. सुरेश जोशी हे नैसर्गिक पानांच्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्याविषयी आग्रही आहेत मात्र या द्रोण पत्रावळी सहजपणे उपलब्ध होत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. मागणीप्रमाणे यांचा पुरवठा झाल्यास पंढरपूर मधील मठ, धर्मशाळा आणि वारकरी संस्था नैसर्गिक पानांच्या पत्रावळीच वापरतील असा त्यांना विश्वास वाटतो.

श्री दिग्विजय जाधव हे जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक आहेत. प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर, वापरलेल्या प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्याने होणाऱ्या गंभीर समस्येचा त्यांनी स्वतः सामना केला आहे. पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षण याविषयी त्यांचे विचार ते मांडत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील श्री शंकर किल्ले आणि त्यांच्या भगिनी अर्चना गुजर वारीमध्ये ऐंशी हजार ते एक लाख लोकांना अन्नदान करतात. यासाठी ते प्लॅस्टिक डिशेसचा वापर करत होते. या डिशेस पर्यावरणासाठी हानिकारक आहेत हे समजताच त्यांनी इथून पुढे नैसर्गिक पानांच्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्याचे ठरवले आहे.

नैसर्गिक पानांच्या द्रोणामध्ये अन्नपदार्थ सेवन करताना खरोखर प्रसाद घेत असल्याची अनुभूती येते अशी भावना व्यक्त करताना एक वारकरी भगिनी…

निगडी, पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल येथे शिकणाऱ्या या विद्यार्थिनींची पर्यावरण विषयक जागरूकता खरोखर कौतुकास्पद आहे.

श्री अनिल डोईफोडे माऊलींच्या पालखी मार्गावर नीरा येथे दरवर्षी अन्नदान करतात. प्लॅस्टिक थर्माकोल प्लेट्स मुळे पर्यावरणाची हानी होते या विषयी ते ज्ञात आहेत मात्र हव्या त्या वेळी नैसर्गिक पानांच्या द्रोण पत्रावळी उपलब्ध होत नाहीत ही त्यांची तक्रार आहे. त्या स्थानिक बाजारात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत ही त्यांची अपेक्षा आहे

वारी मार्गावर अन्नदान करण्यासाठी सर्रास प्लॅस्टिक, थर्माकोल किंवा सिल्व्हर फॉइल प्लेट्स यांचा वापर केला जातो. यामुळे मार्गावरील शेतांमध्ये हा कचरा रानोमाळ पसरतो. यामुळे त्रस्त झालेल्या श्री नवनीत कडबाने राहणार नीरा या शेतकऱ्याचे मनोगत.

लातूर जिल्ह्यातील तरुण मित्र एकत्र येऊन वारीमध्ये अन्नदान करतात. प्लॅस्टिक डिशेसमुळे पर्यावरणास होणाऱ्या हानीविषयी अनभिज्ञ असल्यामुळे ते प्लॅस्टिक पलेट्सचा वापर अन्नदान करण्यासाठी करत होते. निसर्गवारी कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन केले. पुढच्या वर्षापासून अन्नदान करण्यासाठी ते नैसर्गिक पानांच्या द्रोण पत्रावळी वापरणार आहेत असा संकल्प त्यांनी केला आहे.

पांडुरंग हरी! प्लॅस्टिक थर्माकोल प्रदूषण कचरामुक्त पंढरीची वारी. निसर्गवारी, नैसर्गिक द्रोण पत्रावळीची लोकचळवळ. नैसर्गिक पानांच्या द्रोण पत्रावळी वापरा, पाणी वाचवा.

प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानाचे प्रमुख श्री प्रशांत अवचट यांची निसर्गवारी Zee 24 तास या वाहिनीने घेतलेली मुलाखत.

भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आणि थर्माकोल ऐवजी नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे मनोगत मांडणारे एक ज्येष्ठ वारकरी. 

प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानाविषयी श्रीक्षेत्र आळंदी देवस्थान, श्रीक्षेत्र सासवड देवस्थान आणि थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच यांची संयुक्त पत्रकार परिषद. 

अभियानाविषयी वारीतील महिला वारकरी भगिनींचे मनोगत 

प्लॅस्टिक थर्माकोल कचरा प्रदूषणाविषयी जनजागृती करणारा लोक कलावंत (वासुदेव)

अभियानाविषयी वारकरी बंधूंचे मनोगत 

निसर्ग वारी आयोजित प्लास्टिक / थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह.भ.प. श्री भानुदास महाराज तुपे यांचे मनोगत

पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक थर्माकोल कचरा मुक्त दिंडी अभियान अंतर्गत थं क्रिएटिव ने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर एका विद्यार्थिनीने व्यक्त केलेले मनोगत

पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक थर्माकोल कचरा मुक्त दिंडी अभियान अंतर्गत थं क्रिएटिव ने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर दहावीतील विद्यार्थ्यानी व्यक्त केलेले मनोगत

अभियानाचे प्रमुख श्री प्रशांत अवचट याची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मुलाखत झाली. यावेळी त्यांनी प्लॅस्टिक थर्माकोल प्रदूषणाच्या गंभीर धोक्यांविषयी माहिती दिली.